जग बदल घालुनी घाव ! सांगून गेले मला भीमराव !! गुलामगिरीच्या या चिखलात ! रुतून बसला का ऐरावत ! अंग झाडुनी निघ बाहेरी ! घे बिनीवरती धाव !! - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Saturday 21 May 2016

तू कधी देव नव्हतास...
तू कधी देव असल्याचा दावा केला नाहीस..
तू कधी देवाचा संदेशवाहक म्हणून सुद्धा समोर आला नाहीस...
तू जन्माला मानव म्हणून आलास..तू मानव म्हणून वाढलास आणि मानवी कक्षेत बसणारे अथक परिश्रम करूनच सर्वोच्च अशा बुद्धत्व पदास पोहोचलास...
तू आधी मानव, मध्यात मानव आणि शेवटात सुद्धा मानवच होतास..तुझ्या धम्माचा क्रमही तसाच..आदी कल्याणकारी, मध्यात कल्याणकारी आणि अंतात सुद्धा तो कल्याणकारीच..!!!
मानव केंद्रस्थानी ठेऊन, मानव शांतीसाठी, मानव कल्याणाकरिता आयुष्य पणाला लावणारा विज्ञान, प्रेम, मैत्री, स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय यांचे अभुतपूर्व संगम असलेल्या आणि जगाला हिंसेपासून, मानवाला मानवाच्या विरुद्ध उभे ठाकण्यापासून सदैव रोखत आलेल्या महामानवा तुला मी सदैव अनुसरतो...😂

Wednesday 4 May 2016

सिकलसेल आजारावर मार्गदर्शन व उपचार शिबीर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त आनंदवाडी तिवसा येथे सिकलसेल आजार कसा होतो ? या आजारावर उपचार उपलब्ध आहे अथवा नाही या बाबत सखोल असे मार्गदर्शन जिल्हा ग्रामिण रुग्णालय अमरावती येथील आजाराचे समन्वक श्री. विनोद पाटील यांनी केले. या आजाराने अनेक रुग्ण अक्षरशः वेदनेने हैरान होतात, शरीरातील पेशी सिकल म्हणजेच वाकड्या होतात परीणामी रक्त पुरवठा थांबून भयंकर वेदना होतात. या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या आजाराची तपासणी साठी रुग्णाला मोफत किट उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारला निवेदन द्यावे असे त्यांचे म्हणने होते या साठी आमच्या संघटनेने पुढाकार घेऊन स्वाक्षरी मोहीम राबवली व त्याची प्रत मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना पाठविली. 

आपण या मोहिमेत सहभागी होऊन सिकलसेल आजारापासून मुक्ती मिळवुया !!!





खालील पत्राचा आपण जरुर विचार करावा.




Thursday 21 April 2016

अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा परीक्षा



विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आमची संघटना हार्दिक स्वागत करते !!