जग बदल घालुनी घाव ! सांगून गेले मला भीमराव !! गुलामगिरीच्या या चिखलात ! रुतून बसला का ऐरावत ! अंग झाडुनी निघ बाहेरी ! घे बिनीवरती धाव !! - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

सुकन्या समृद्धि योजना



ही योजना भारत सरकारची असून त्याची अधिसूचना क्र. जी.एस.आर.863(ई) दि. 2 डिसें. 2014 अन्वये सुरु करण्यात आली. भारतीय रिझर्व बँक द्वारा पत्र क्रं. आरबी आय /2014-15/494/आयडीएमडी. सीडीडी/ क्रं.4052/15.02.006/2014-15 दि. 11 मार्च 2015 नूसार सर्व बँकांना ही योजना कार्यान्वीत करण्याचे आदेश देण्यात आले.

  • योजनेचा हेतू - मुलींच्या विकासा करीता
  • खाते कोण काढू शकते ? - ज्यांना एक किंवा दोन मुली आहे / मुलींचे वय 1 ते 10 वर्ष पर्यंतची अट
  • किती रक्कम जमा करावी ? - दर वर्षाला कमीतकमी 12000 ( प्रती महिना 1000 रु.) जास्तीत       जास्त वार्षीक 150000 रु.
  •  जमा मुदत - 14 वर्ष खाते काढल्या पासून ( 21 वर्षापर्यंतही जमा करु शकता.)
  • जमा रकमेवर व्याज - चक्रवाढ व्याज पध्दतीने वार्षीक 9.20% (किंवा वेळोवेळी सरकार घोषीत करेल तो दर)
  • करात सुट - आयकर धारा 80 सी नूसार
  • रक्कम कधी काढता येईल ? -  मुलगी 18 वर्षाची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी जमा रकमेच्या 50% आणि वयाच्या 21 व्या वर्षी पूर्ण रक्कम काढता येईल.
  • अधिक माहितीसाठी आपण www.nsiindia.gov.in या संकेतस्ठळाला भेट द्या.
  • ही योजना भारतीय डाक विभाग व भारतीय स्टेट बँक मध्ये सुरु करता येईल.


 आपण रक्कम किती भरली म्हणजे आपल्याला किती रक्कम मिळेल हे जाणून घेण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करा.





No comments:

Post a Comment